तमिळनाडूतील इसिसचे मोड्यूल उध्वस्त, तरुणांचे ब्रेन वॉश करणाऱ्याला अटक

30

सामना ऑनलाईन । कोईम्बतूर

राष्ट्रीय तपास संस्थेने आज इसिसशी संबंधित तमिळनाडूतील सात ठिकाणांवर छापे मारले असून या छाप्यांदरम्यान एका व्यक्तीला अटक केली आहे. मोहम्मद अझरुद्दीन असे त्या व्यक्तीचे नाव असून तो इसिसमध्ये सामिल होण्यासाठी तरुणांचे ब्रेन वॉश करायचा. मोहम्मद अझरुद्दीनने आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांचे ब्रेन वॉश केले असून तो श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मित्र आहे. अझररुद्दीन सोबत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे.

इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने साधम, अकबर, अझरुद्दीन, अबुबक्कर, इदियातुल्ला आणि साखीमशाह यांच्या घरांवर छापे मारले. या छाप्यांच्या वेळी 14 मोबाईल, 29 सिम कार्ड, 10 पेन ड्राईव्ह, 3 लॅपटॉप, 6 मेमरी कार्ड, 4 हार्ड डिस्क, 13 सिडी, 300 एअर गन पॅलेट्स जप्त करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या