मोहिनी पुन्हा आलीये

सामना ऑनलाईन । मुंबई

‘तेजाब’ या चित्रपटातील अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘एक,दो, तीन…’ या गाण्याची जादू आज इतक्या वर्षानंतरही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. ८०च्या दशकाच्या याच हिट गाण्याची जादू आगामी ‘बागी २’ या अॅक्शन थ्रीलर चित्रपटात पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसवर हे गाणे चित्रीत करण्यात आले असून नुकतीच या गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. माधुरीच्या ड्रेससारखा रंगीबेरंगी ड्रेस जॅकलीनसाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी खास तयार केला आहे. याबद्दल जॅकलीन म्हणाली, माधुरीसारख्या लिजंडच्या गाण्यावर डान्स करणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्यांच्यासारखा डान्स कुणी करू शकत नाही. हा आमच्याकडून माधुरीला सलाम आहे.’