पिसाळलेल्या माकडामुळे दहशत, २२ जणांचा घेतला चावा

प्रतिनिधी । पुणे

गेल्या काही दिवसांपासून नांदेड गावात पिसाळलेल्या माकडाने उच्छाड मांडला आहे. भर रस्त्यात नागरिकांवर हल्ला करून कडकडून चावा घेत आहे. आत्तापर्यंत २२ जणांना हे माकड चावले असून, त्यातील तिघे गंभीर आहेत. याबाबत वन विभागाकडे तक्रार करूनही हे माकड पकडता आले नसल्याने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून नांदेड गावात १० ते १५ माकडांच्या टोळीने मुक्काम ठोकला आहे. त्यातील एक माकडे पिसाळले आहे. ते कधीही कुठूनही उडी मारते आणि लोकांना कडाडून चावत आहे. दुचाकीस्वारांना तर हे माकड लक्ष करत आहे. चातल्या गाडीवर उडी मारून मागे बसत आहे चावा घेत आहे. या पिसाळेलेल्या माकडाच्या धुमाकुळात आत्तापर्यंत २२ जण जखमी झाले आहेत. यामध्ये राजेंद्र कानपिळे यांना १४ आणिगंगाधर बावधाने यांना ८ टाके पडत आहेत. आणखी एका परप्रांतीय नागरिकांलाही चावल्याने गंभीर जखम झाली आहे.

दिवसा ढवळ्या हे माकड घरात घुसून महिला व लहान मुलांवर हल्ले करत असल्याने गावात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांना दारे बंद करून घरात बसावे लागत आहेत. याबाबत वन विभागाकडे तक्रार केली होती चार दिवसांपूर्वी या माकडला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. पण कर्मचाऱ्यांचा निशाणा लागलाच नसल्याने हे पिसाळलेले माकड मोकाट आहे, असे नांदेड गावचे ग्रामपंचायत सदस्य विकास लगड यांनी सांगितले.

भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. मिलींद कुमार खैरे म्हणाले, ही माकडे एनडीए व नांदेड गावाच्या परिसरात फिरत आहेत. आमचे पथक दोनदा तेथे जाऊन आली, पण माकडे सापडली नाहीत. भुलीचे इंजेक्शन देताना बघ्यांची गर्दी होत असल्याने इंजेक्शन मारता येत नाही. आत्तापर्यंत त्यामुळे दोन इंजेक्शन वाया गेले आहेत.