पेट्रोल पिणारे माकड

सामना ऑनलाईन । हरियाणा

हरियाणाच्या पानिपत शहरात एक विचित्र माकड दिसतं. त्या माकडाला गाडीतील पेट्रोल प्यायला आवडतं. बाजारात उभ्या असलेल्या मोटरसायकलचा पेट्रोल पाइप तो दाताने चावतो. त्यानंतर पाइप तोंडाला लावून सारे पेट्रोप पितो. या माकडाचे वैशिष्ट्य़ म्हणजे खाण्यापिण्याचा कोणत्याही वस्तूला तो हात लावत नाही. तो फक्त मोटरसायकलचा शोध घेत असतो. कधी एकदा मोटरसायकल येते आणि कधी मी पेट्रोलला तोंड लावतो, अशी त्याची अवस्था असते.

माकडाची लोकप्रियता आता पानिपत, हरियाणाच्या बाहेर सर्वदूर पोचली आहे. ज्या मोटरसायकलस्वारांचा माकडाच्या या विचित्र वागण्याचा फटका बसलाय, त्यांनी माकडाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. माकडाला प्रसिद्ध करून टाकले आहे.