आता व्हॉटस्ऍपवरून करा पैसे ट्रान्सफर

37

सामना ऑनलाईन, मुंबई

व्हॉटस्ऍप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. पेटीएम, मोबिक्वीकप्रमाणे आगामी काळात व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून देखील ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता येणे शक्य होणार असून पुढील सहा महिन्यांत हे नवीन फिचर व्हॉटस्ऍपवर कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात व्हॉटस्ऍपचे को फाऊंडर ब्रायन ऍक्टन यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली.त्यावेळी डिजीटल पेमेंटबाबत विचार सुरू असल्याचे ऍक्टन म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या