चंद्रमा आकसतोय…थरथरतोय, अमेरिकन संशोधकांचा दावा

1

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

मोहक चंद्र आणि त्याच्या पौर्णिमेच्या कला सारंच कसं भुरळ पाडणारं असते. या चंद्राबद्दल कुतूहलता वाढवणारी आणखी एक गोष्ट समोर आलेय. पण ही काहीशी चंद्रपेमींची चिंता वाढवणारी बाब आहे. आपला लाडका चंद्र आतून आकसू लागलाय. द्राक्ष कसं आकसून मनुका बनतं अगदी तस्संच. एवढंच नव्हे तर त्याची थरथरह जाणवत आहे. अमेरिकेच्या संशोधकांनी हा अभ्यास केलाय.

चंद्रावरील कंपनाचे संशोधन नुकतेच नेचर जिओसायन्सच्या जर्नलमध्ये  प्रकाशित झाले आहे. या संशोधनासाठी अपोलोच्या अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चार भूकंपमापन यंत्रे बसवली आहेत. अल्गोरिदम, गणिती प्रोग्रॅमचा आधार घेण्यात आला. त्यामुळे मूनक्वेक म्हणजे चंद्रावर कंपनं होणारी ठिकाणी अचूक हेरण्यात आली. अपोला 11, 12, 14, 15 आणि 16 यान मोहिमेमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उपकरणं पाठवण्यात आली. त्यातील अपोलो  11 यानातील भूकंपमापना यंत्राने फक्त तीन आठवडे काम केले, तर अन्य चार यानांनी 28 कंपनांची नोंद केली.

  • चंद्रावरची कंपने दोन ते पाच रिश्टर स्केलची आढळली आहेत.
  • अपोलो यानातील उपकरणांमुळे चंद्राची कंपनं टिपली आहेत.