गणपती स्पेशल ट्रेनना जादा डबे,अनारक्षित डब्यांमुळे भक्तांची सोय होणार

35
konkan-railway

सामना ऑनलाईन, मुंबई

कोकणात गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची उसळणारी गर्दी पाहून मध्य रेल्वेने सोडलेल्या चार गणपती स्पेशल गाडय़ांना प्रत्येकी तीन अनारक्षित द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने यंदा कोकण मार्गावर दोनशेहून अधिक स्पेशल गाडय़ा सोडल्या आहेत.

मध्य रेल्वेने जादा डबे जोडलेल्या गाडय़ांमध्ये दि. 11 आणि 18 सप्टेंबर 2018 रोजी सुटणारी ट्रेन क्र. 01095, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड आणि 12 आणि 19 सप्टेंबर 2018 रोजी सुटणारी परतीच्या प्रवासासाची ट्रेन क्र. 01096 सावंतवाडी रोड ते एलटीटी तसेच 13 आणि 15 सप्टेंबर रोजी सुटणारी ट्रेन क्र. 01103 एलटीटी ते सावंतवाडी रोड स्पेशल तसेच परतीच्या प्रवासासाठीची 14 आणि 16 सप्टेंबर रोजी सुटणारी ट्रेन क्र. 01104 सावंतवाडी रोड ते एलटीटी या गाडय़ांचा समावेश आहे.

  •  ट्रेन क्र. 01095 एलटीटी – सावंतवाडी रोड स्पेशल           (11 आणि 18 सप्टेंबर)
  •  ट्रेन क्र. 01096 सावंतवाडी रोड – एलटीटी स्पेशल           (12 आणि 19 सप्टेंबर)
  •  ट्रेन क्र. 01103 एलटीटी – सावंतवाडी रोड स्पेशल           (13 आणि 15 सप्टेंबर)
  •  ट्रेन क्र. 01104 सावंतवाडी रोड – एलटीटी स्पेशल           (14 आणि 16 सप्टेंबर).

 

आपली प्रतिक्रिया द्या