आश्चर्य… दुष्काळाने माणसांचे स्थलांतर, मात्र वन्यजीव कमालीचे वाढले

130
animals-in-beed3

उदय जोशी । बीड

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रांच्या शीतल प्रकाशात जिल्ह्यातील वन्यप्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी प्रादेशिक वन विभाग व नायगाव मयूर अभयारण्य याच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील सर्व वनक्षेत्रातील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. यावेळी नायगाव मयूर अभयारण्यात प्रथमच तर प्रादेशिक वनविभागाची तिसऱ्यांदा ट्रॅप कॅमेऱ्याने पानस्थळावर प्रगणना करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात 12 हजार 774 वन्यजीव आढळून आले.

वन्यप्राण्यांच्या प्रगणणेसाठी प्रादेशिक वन विभागाचे विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी आर.आर. काळे व सहाय्य वनसंरक्षक रमेश सोनटक्के निसर्गमित्र सिद्धार्थ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी, तसेच वन्यजीव प्रेमी, पक्षीप्रेमी यांच्या मदतीने जिल्ह्यात वन्यप्राण्यांची प्रगणना बुद्ध पौर्णिमेला करण्यात आली. जिल्ह्यातील वनक्षेत्रात असणाऱ्या 157 पाणवठ्यावर 35 ट्रॅप कॅमरे बसवून प्रगणकांनी वन्यजीव प्रगणना केली.

या प्रगणनेच्या टीममध्ये स्वतः विभागीय वन अधिकारी सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास गीते, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे, रंगनाथ शिंदे, सायमा पठाण, वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे, सर्पराज्ञी संचालिका सृष्टी सोनवणे, कु.रविना सवाई, विनय इंगळे, वनपाल देवगुडे अजय, दिगंबर फुंदे, वनरक्षक राजू नांदूरे, कु. गायकवाड वैशाली, एस. पी.शेळके, विजय केदार, शिवाजी आघाव, यांच्यासह जिल्ह्यातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर आदींनी परिश्रम घेतले.

बिबट्या, लांडगा, तरस , गरुड, उद, काळवीट, कोल्हे, खोकड, ससा, सायाळ, चिंकारा, रानमांजर, उदमांजर, जावडिमांजर, रानडुकरे, नीलगाय, तरस, मोर, गरुड, घुबड आदी सामन्य, दुर्मिळ वन्यप्राण्यांचा वावर बीड जिल्ह्यात चांगलाच असल्याचे यावेळी दिसून आले.

विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांनी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर जिल्ह्यातील पाणवठ्यावर जाऊन पाहणी केली, तसेच नायगाव मयूर अभयारण्यातील पाणवठ्यावरील प्रगणकांच्या भेट दिली.त्यानंतर रात्री दोन ते सहा स्वतः तागडगाव येथील सर्पराज्ञी प्रकल्पावरील पाणवठ्यावर निरीक्षण नोंदविली.
………………………………………..

  • अभयारण्यात प्रथमच वन्यजीव गणनेसाठी ट्रॅप कॅमेरा वापर
  • अभयारण्यात 84 पाणवट्यावर प्रगणना
  • अभयारण्य क्षेत्रा बाहेरी 73 पाणवट्यावर प्रगणना
  • 24 तास वन्यजीव प्रगणना
  • अभयारण्यातील ऐकून वन्यजीव 10121
  • अभयारण्य क्षेत्रा बाहेरील एकूण वन्यजीव 2653
  • अभयारण्य आणि अभयारण्य क्षेत्राबाहेर दुर्मिळ आणि संकटग्रस्त वन्यजीवांचा मोठा वावर

बुद्ध पौर्णिमेलाच का केली जाते वन्यजीव गणना?

“बुद्ध पौर्णिमा ही उन्हाळ्याच्या दिवसातील सर्वाधीक प्रकाशमान रात्र असते. शिवाय उन्हाळाच्या शेवट असल्याने तीव्र असतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी जंगलातील पाणवठ्यावर पशु पक्षी पाणी पिण्यासाठी हमखास येतात. त्यामुळे या दिवशी 24 तासात पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांची नोंद घेतली जाते.”

– अमोल सातपुते (विभागीय वन अधिकारी बीड)

“बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थितीत असतांनाही अभयारण्य व अभयारण्य क्षेत्राबाहेर वन्यजीवांची संख्या वाढली असल्याने या वन्यजीव प्रगणनेतून दिसून आले आहे. हे सर्व पाणवठ्यातील नियमित पाणी पुरवठा केल्याने श्यक्य झाले आहे. या प्रगणनेतुन बीड जिल्ह्यातील जैवविधता कळून आली आहे. या वन्यजीव प्रगणनेचे आमचे हे एकोणिसावे वर्ष आहे.

– सिद्धार्थ सोनवणे (वन्यजीव अभ्यासक)
…………………………………………
नायगाव मयूर अभयारण्य वन्यजीव प्रगणना

मोर – 8203
कोल्हा – 57
ससा – 274
उद – 15
खोकड – 32
रानडुक्कर – 680
मुंगूस – 110
सायाळ – 147
लांडगा – 11
चिंकारा – 93
तरस – 05
रानमांजर – 25
काळवीट – 458
नीलगाय – 10
एकूण वन्यजीव – 10121

अभयारण्य क्षेत्राबाहेरील जिल्ह्यातील वन्यजीव प्रगणना

काळवीट – 423
चिंकारा – 252
खोकड – 28
कोल्हा – 63
ससा – 92
रानडुक्कर – 741
सायाळ – 66
मुंगूस – 15
घोरपड – 02
लांडगा – 25
तरस – 02
मोर – 881
नीलगाय – 32
खार – 24
गरुड – 05
एकूण वन्यजीव – 2653

आपली प्रतिक्रिया द्या