वाराणसीत निर्माणाधीन पूल कोसळला, १८ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । वाराणसी

वाराणसीमध्ये एक निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळल्याने झालेल्या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झालाय. वाराणसीतील कँटॉन्मेंट भागातील रेल्वे स्टेशनजवळ या पुलाचे काम सुरु होते. या पुलाखाली आणखी ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वाढण्याची शक्यता आहे. पुल कोसळल्याची घटना समजताच प्रशासनाने मदतकार्य सुरु केले आहे.

मंगळवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाला. हा पुल कोसळला त्यावेळी या पुलाखाली अनेक गाड्या होत्या. या गाड्यात अनेक जण अडकल्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी ३ सदस्यीय समितीची स्थापना उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना २ लाखांची मदत उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केली आहे.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.