मोबाईल गेम्समध्येही बाहुबलीच बाहुबली!

5

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या चित्रपट सृष्टीत नवे विक्रम रचणाऱ्या बाहुबलीची छाप प्रेक्षकांवर कायम आहे. बाहुबलीचं जणू वेडच या हिंदुस्थानी प्रेक्षकांना लागलं आहे. सिनेमाचे विक्रम मोडणारा बाहुबली मोबाईल गेम्सच्या विश्वातही खराखुरा बाहुबली ठरला आहे.

बाहुबली-२ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बाहुबली नावाचा एक मोबाईल गेम बाजारात आणण्यात आला. सिनेमा इतकाच हा मोबाईल गेम हिट ठरला असून आज ५ दशलक्ष असा डाऊनलोडिंगचा मोठा टप्पा या गेमनं ओलांडला आहे. याबद्दल बाहुबलीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याची माहिती देण्यात आली असून डाऊनलोड करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभारही मानण्यात आले आहेत. त्यामुळे बाहुबलीची चर्चा अद्यापही सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या