धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा! संभाजीनगर खंडपीठाचे आदेश

55

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

जगमित्र साखर कारखान्यासाठी सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याचे सिद्ध झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के.के. सोनवणे यांनी दिले.

शेतकऱ्यांना क बँकांना 5400 कोटी रुपयांना बुडवणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई राजाभाऊ फड यांनी राजकीय सूडबुद्धीने माझ्याविरुद्ध कोर्टात केस दाखल केली आहे.

 

प्रकरण काय आहे?

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जुने सर्व्हे क्रमांक 24, 25 आणि इतर शासकीय जमीन बेलखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आली होती. या मंठाचे महंत रणजित व्यंका गिरी हे होते. मठाची जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करता येऊ शकत नाही.

मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने संगनमत करून ती जमीन परस्पर स्वतःच्या नावे नोंदवून घेतली आणि ही जमीन आपल्या नावे असल्याचे दावे दाखल करून स्वतःच्या नावे हुकूम काढून घेतले. शासनाला याची कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही.

ही सर्व जमीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी जगमित्र साखर कारखान्यासाठी मुखत्यारनाम्यांआधारे खरेदी केली आणि त्याचा अकृषक (एनए) कर लावून घेतला. ही जमीन शासनाची असल्याने शासनाला अंधारात ठेवून फसवणूक करत तिची परस्पर विल्हेवाट लावत नोंदी करून घेतल्या.

ही शासनाची फसवणूक असल्याने दाखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार राजाभाऊ फड यांनी पोलिसात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय दबावामुळे त्याची दखल घेण्यात आली नाही.

जमिनीच्या रेकॉर्डवर ‘शासन’ नाही

या जमिनीसंदर्भात ट्रस्टी आणि  पुजारी यांच्यात वाद होता. हा दावा न्यायालयात गेला आणि न्यायालयीन डिक्रीच्या आधारे  देशमुख हे या जमिनीचे मालक ठरले. 2012मध्ये  देशमुख यांच्याकडून धनंजय मुंडे यांनी पैसे देऊन ही जमीन खरेदी केली. रेकॉर्डवर शासनाची जमीन असल्याची कोणतीही नोंद नव्हती, असे मुंडे यांचे वकील सिद्धेश्वर ठेंबरे यांनी कोर्टात सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या