राजेश गोहिल आणि संगीता चांदोरकर यांना जेतेपद

सामना ऑनलाईन । दादर

बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत क्षात्रैक्य समाज व मोरॅक असोसिएशन, मुंबईतर्फे आयोजित प्रथम मुंबई जिल्हा अजिंक्यपद मोरॅक स्पर्धेत पुरुष, महिला, ज्युनिअर मुले, ज्युनिअर मुली, वरिष्ठ नागरिक, प्रौढ गट महिला आणि पुरुष एकेरी गटात अनुक्रमे शिवताराच्या राजेश गोहिल, रिझर्व्ह बँकेची संगीता चांदोरकर, नमिशचा रितिकेश वाल्मीकी, एम. एन. फाऊंडानची श्रुती सोनावणे, एम. एन. फाऊंडेशनचा सुरेश काजरोळकर, नाबार्डची नॅन्सी सिक्वेरा आणि रिलायन्स एनर्जीची नरसिंगराव सकारी यांनी पहिले विजेतपद पटकावण्याचा मान मिळविला. या स्पर्धेला ६५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.