जेट विमानात डासांचा हल्ला

सामना ऑनलाईन। लखनौ

विमान प्रवास हा सर्वात आरामदायी प्रवास आहे असं म्हटल जात. पण गेल्या काही महिन्यांपासून विमानाने प्रवास करणही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. असाच काहीसा अनुभव जेट विमानाने लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या एका प्रवाशाला आला आहे. संपूर्ण विमान प्रवास डास मारत करावा लागल्याने वैतागलेल्या या प्रवाशाने टि्वटरवर जेटमध्ये डासांचा हल्ला झाल्याचे सांगितले आहे.

चरण सिंह चौधरी असे या प्रवाशाचे नाव आहे. चरण जेटच्या ९ डब्ल्यू २६६३ या विमानाने रविवारी लखनौहून दिल्लीला जात होते. यावेळी विमानात डास असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब हवाई सुंदरीच्या निदर्शनासही आणून दिली. पण त्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही. यामुळे लखनौ ते दिल्लीपर्यतचा प्रवास चरण व इतर प्रवाशांना डास मारतच करावा लागला. यामुळे वैतागलेल्या चरण व इतर प्रवाशांनी टि्वटवरच आपली तक्रार मांडली. विमानात औषध फवारणी करण्यात आली नव्हती. असे यात म्हटले आहे. पण त्यावर उडाण्णापूर्वी विमानात व्यवस्थित साफसफाई करण्यात आल्याचे जेट प्रशासनाने म्हटले आहे