दोन खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक वर्ल्डकप खेळण्याचा विक्रम, एक सचिन दुसरा?

124

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसी वर्ल्डकपमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे प्रत्येक क्रिकेट खेळाडूचे स्वप्न असते. अनेकांची क्रिकेट कारकीर्द संपून जाते परंतु क्रिकेट विश्वचषकात खेळण्याची संधी मिळत नाही. परंतु काही असेही खेळाडू आहेत ज्यांना तब्बल 6-6 वेळा वर्ल्डकपमध्ये आपल्या देशाकडून खेळण्याची संधी मिळाली.

आयसीसी वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त वेळा भाग घेणारे दोनच खेळाडू आहेत आणि ते देखील कट्टर प्रतिस्पर्धी संघातील. एकाचे नाव अर्थात हिंदुस्थानचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसऱ्या खेळाडूचे नाव आहे पाकिस्तानचे जावेद मियांदाद. या दोन्ही खेळाडूंनी तब्बल 6 वेळा विश्वचषकात हजेरी लावली आहे.

javed-miandad

सचिन तेंडुलकरने 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. हिंदुस्थानने 2011 मध्ये विश्वचषक जिंकून सचिनला भेट दिला होता. तर जावेद मियांदाद यांनी 1975, 1979, 1983, 1987, 1992 आणि 1996 मधील वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या