मदर डेअरीचे दूध एक रुपयाने महागले

6

सामना प्रतिनिधी । मुंबई

अमूलच्या दुधानंतर उद्यापासून मदर डेअरीचे दूधही महागणार आहे. मदर डेअरीची एक लिटर दुधाची पिशवी खरेदी करताना एक रुपया जास्त द्यावा लागेल. जर अर्ध्या-अर्ध्या लिटरच्या दोन पिशव्या घेतल्या दर प्रति लिटर 2 रुपये जास्त आकारले जातील. ही दरवाढ फक्त फुल क्रीम दुधासाठी करण्यात आली आहे. 25 मेपासून मदर डेअरीचे फुल क्रीम एक लिटर दूध 52 ऐवजी 53 रुपयांना मिळेल, तर अर्ध्या लिटरच्या पिशवीसाठी 27 रुपये मोजावे लागतील. फुल क्रीम प्रीमियर दुधासाठी एक लिटरच्या पिशवीसाठी 55 रुपये आणि अर्ध्या लिटरच्या पिशवीसाठी 28 रुपये द्यावे लागतील. टोंड मिल्क एक लिटर दूध 42 रुपये आणि अर्धा लिटर दूध 22 रुपये आहे.  डबल टोंड एक लिटर दुधाच्या पिशवीसाठी 35 रुपये आणि अर्धा लिटरच्या पिशवीसाठी 19 रुपये मोजावे लागतात.

आपली प्रतिक्रिया द्या