मोटारसायकल पुलाच्या कठड्याला धडकली, दोन विद्यार्थी ठार, एक गंभीर

सामना प्रतिनिधी । वडवणी

मित्रासोबत दुचाकीवरून पाली येथून बीड येथे येत असताना दुचाकी पुलाच्या कठड्यास धडकली. या अपघातात दुचाकीवरील विद्यार्थी दोन ठार झाले आहे.

वडवणी तालुक्यातील देवडी येथील कृष्णा विश्वनाथ मात्रे, विशाल चंद्रकांत खडके, प्रदीप दत्तात्रय निपटे (पिंपरखेड) हे तिघे बीड येथे महाविद्यालयात शिक्षण घेतात. सोमवारी ते पाली येथे दुचाकीवर गेले होते. परत येताना समोरून त्यांची दुचाकीस चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी पालीच्या घाटातील एका पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात कृष्णा विश्वनाथ मात्रे हा अठरा वर्षीय मुलगा व विशाल चंद्रकांत खडके ठार झाले व प्रदीप दत्तात्रय निपटे हा गंभीर जखमी झाला तर जखमीला बीडच्या सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. विशाल खडके याचा डोक्याला जास्त मार लागल्याने त्याला संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. कृष्णा मात्रे याच्यावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने देवडी गावावर शोककळा पसरली आहे.