तोंड जेवणासाठी आहे, ओरल सेक्ससाठी नाही!

सामना ऑनलाईन, कंपाला

समलैंगिकांविरूद्ध कठोर पावलं उचलणाऱ्या युगांडाच्या राष्ट्रपतींनी आता ओरल सेक्सविरोधातही तशीच भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेले एक विधान फक्त युगांडामध्येच नाही तर जगभरात चर्चेचा विषय बनले आहे

योवेरी मुसेवनी यांनी म्हटलंय की “बाहेरच्या काही मंडळींमुळे युगांडामध्ये काही चुकीच्या गोष्टी प्रचलित व्हायला लागल्या आहेत. तोंडाचा वापर खाण्याऐवजी ओरल सेक्ससाठी केला जात असून यावर बंदी घालण्यात आली पाहिजे” मुसेवनी इतक्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की मी जाहीरपणे इशारा देतोय, काही गोष्टी बंद झाल्याच पाहिजेत आणि त्यामध्ये ओरल सेक्स ही देखील महत्वाची गोष्ट आहे.

मुसेवनी यांनी २०१४ साली समलैंगिकांबद्दल कठोर कायदे तयार केले होते. या कायद्यांमुळे युगांडामध्ये समलैंगिकता हा गुन्हा बनला आहे. इतकंच नाही तर समलैंगिकतेबद्दल माहिती न देणाऱ्यांविरोधातही या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येऊ शकते.