वारंवार तोंड येत असेल तर ….

1081

सामना ऑनलाईन। मुंबई

तोंड येणे ही सामान्य बाब वाटत असली तरी यामागे अनेक कारणे आहेत. साधारणत: ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतात अशा व्यक्तींना वरचेवर तोंड येत असते.तर काही जणांना खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्यामुळे अॅलर्जी होते. त्यामुळे तोंड येते. पण वरचेवर जरी ही सामान्य समस्या वाटत असली तरी तोंड आल्यामुळे उपासमारही होते. तिखट, तेलकट, तूपट, खारट, गरम पदार्थ खाता येत नाहीत. त्यामुळे भूक असूनही उपाशी राहावे लागते. पण काही घरगुती उपचार केल्यास ही समस्या सोडवता येते.

तोंड येण्यावर तुळशीची पाने खाणे फायदेशीर असते. तुळशीच्या पानात अँटीबायोटीक्स असतं. याचा रस तोंडातील लाळेत मिसळतो. यामुळे तोंडातील अल्सर बरा होतो.

तोंड आल्यावर तोंडात अल्सर होतो. तोंड भाजतं, चुरचुरतं. साध पाणीही पिताना तोंडाची आगआग होते. पण जर तोंड्याच्या आतील बाजूस तूप लावले तर ते ग्लिसरीनचं कामं करत. तसेच रोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप टाकून ते घेतलं. तरी आराम मिळतो. अल्सर कायमचा जातो.

मधात अँटीबायोटीक्स असतं. मध घेतल्यामुळे पाचन शक्ती तर सुधारतेच. तसेच अल्सर वर जरी मध लावल तरी आराम मिळतो. अल्सरवर मध लावल्यावर तोंडात खूप लाळ येते. पण याच लाळेतून अल्सर बरा होतो.

तोंड आल्यावर २ ते ३ लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करा. ही पेस्ट अल्सरवर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याच्या गुळण्या करा. लवकर आराम मिळेल.

तूरटीमध्ये अँटीबायोटीक्स असतं. अल्सरवर ती लावल्यास खूप भाजतं. पण वेदना कमी होते. संसर्ग होत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या