
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने नुकताच साखरपुडा केला आहे. प्रतीकने त्याची गर्लफ्रेंड सान्या सागर हिच्या सोबत साखरपुडा केला असून त्याने स्वत: इन्स्टाग्राम अकाउन्टवरून साखरपुड्याची माहिती दिली आहे.
प्रतीक आणि सान्या एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखतात. सोमवारी लखनौमधील मोहनलालगंज येथील एका रिसॉर्टमध्ये या दोघांचा साखरपुडा पार पडला. प्रतीक साखरपुड्याच्या कार्यक्रमाला मीडियापासून, लाईमलाईटपासून दूर ठेवायचे असल्याने कोणत्याही चर्चेशिवाय हा कार्यक्रम पार पडला. सान्या लेखिका असून बसपा नेते पवन सागर यांची मुलगी आहे. तर प्रतीक दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आहे.
इसक या चित्रपटानंतर बराच काळ प्रतीक बॉलिवूडपासून दूर होता. पण, यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या अहमद खान दिग्दर्शित ‘बागी २’ या चित्रपटातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.