जेव्हा खासदार अशोक चव्हाण मतदानाची तारीखच विसरतात


सामना ऑनलाईन । नांदेड

मतदनाची तारीख जस जशी जवळ येत आहे, तसा प्रचार शिगेला पोहोचत आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या जाहीर सभेत मतदारांना मतदानाची तारीख सांगून मत देण्याचे कळकळीचे आवाहन करतात. मतदानाची तारीख एका प्रकारे उमेदवाराचे भविष्य ठरवणारी तारीख असते. परंतु काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण ही मतदानाची तारीखच विसरले आणि भलत्याच दिवशी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

नांदेडमध्ये सोमवारी निवडणुकीच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. त्यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली. यावेळी खासदार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही भाषण झाले. चव्हाण यांनी आपल्या भाषणात वेगवेगळ्या विषयांचा व मुद्यांचा उल्लेख केला. मात्र शेवटी मतदानाची तारीखच विसरले. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी येत्या 19 तारखेला पंजा या निशाणीवर मतदान करावे, असे आवाहन केले. मतदानाची तारीख त्यांनी चुकीची सांगितल्याने सर्वच जण आवाक झाले.