तरुणीने फेसबुकवर ब्लॉक केले, रागाच्या भरात तिच्या मित्राला खुपसले


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये खुनाचा धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. तरुणीने फेसबुकवर ब्लॉक केल्याने तरुणाने तिच्या मित्राची चाकू खुपसून हत्या केली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. रितेश ठाकूर असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश ठाकूरची काही महिन्यांपूर्वी कॉमन फ्रेंड अजय दुबेच्या मैत्रिणीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. अजयने तिला फ्रेंड रिक्वेस पाठवली आणि दोघांमध्ये सोशल मैत्री झाली. परंतु काही दिवसांनी रितेश तिला अश्लिल आणि विचित्र मेसेज फॉरवर्ड करू लागला. याचा राग आल्याने तरुणीने त्याला ब्लॉक केले. तरुणी आपल्याशी न बोलता अजयशी बोलत असल्याने रितेशच्या मनात मत्सर निर्माण झाला. याच वेळी त्याने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

अजय हा बीएचे शिक्षण घेत होता आणि पोलीस परिक्षेचेही तयारी करत होता. तरुणीने ब्लॉक केल्याने रितेशने अजयचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्याला आणि त्याचा रुम पार्टनर यशला 6 जानेवारीला एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले. अजय आणि यश दोघे रात्री 9 च्या रुमारास ठरवलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी पोहोचले. रितेशशी भेटण्यासाठी अजयने हात पुढे केला परंतु त्याने चाकू बाहेर काढत त्याच्या गळावरून फिरवत खून केला. हत्या केल्यानंतर रितेश फरार झाला. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी पथक नेमून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. आरोपीची आई सरपंच असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.