खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुका पिंजून काढला, ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

3

सामना ऑनलाईन । न्हावाशेवा

मावळ लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला उरण तालुक्यातून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवार 20 एप्रिल रोजी प्रचार रॅली काढण्यात आली होती. खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकरी आंदोलनातील जासई येथील हुतात्म्यांच्या पुतळ्याला आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन प्रचार रॅलीला सुरूवात केली. यावेळी मोठ्या संख्येने युतीचे कार्यकर्ते रॅलीमध्ये सामील झाले होते. तर तरूणांनी बाईक रॅली काढली होती. यावेळी संपूर्ण उरण तालुका पिंजून काढण्यात आला. ठिकठिकाणी बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे आमदार आणि जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, भाजपाचे नेते आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, माजी जिल्हाप्रमुख आणि जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र घरत, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी.एन.डाकी, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, शहर अध्यक्ष कौशिक शहा, उरण नगरपालिकेतील सेना भाजपाचे सर्व नगरसेवक, तालुक्यातील सेना-भाजपाचे सरपंच आणि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.