मेलबर्न मैदानावर चाहत्यांनी केले धोनीचे जोरदार वेलकम, व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे

2

सामना ऑनलाईन । मेलबर्न

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियामध्ये एक दिवसीय मालिका जिंकून इतिहास रचला. या मालिकेत तीनही सामन्यात महेंद्र सिंह धोनीने दमदार फलंदाजी करत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चाहत्यांच्या हा लाडका कॅप्टन कूल धोनी मेलबर्नमध्ये जेव्हा मैदानावर येत होता तेव्हा चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत

मेलबर्नमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 230 धावांवर रोखले. मात्र टीम इंडियाची सुरुवात देखील अतिशय संथ झाली त्यात रोहीत शर्मा व शिखर धवन हे सलामीवीर लवकर तंबूत परतल्यामुळे हिंदुस्थानी चाहते नाराज झाले होते. मात्र त्यांचा लाडका फलंदाज धोनी मॅच जिंकवणारच असा विश्वास असल्याने चाहत्यांनी जोर जोरात धोनी धोनी असे ओरडत त्याचे स्वागत केले. चाहत्यांच्या या प्रेमाने धोनीचा आत्मविश्वास नक्कीच दुपटीने वाढला व त्याने चाहत्यांना नाराज केले. धोनीच्या दमदार खेळीने हिंदुस्थानने सामना तर जिंकला सोबत मालिकाही खिशात घातली.