‘पांडे तिकडे नाही, इकडे बघ इकडे’; कूल धोनी शेवटच्या षटकात का भडकला?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एरव्ही कोणत्याही प्रसंगात अगदी कूल राहणाऱ्या धोनीचा काल नवा अवतार मैदानात पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेटी सामन्याच्या वेळचा त्याचा राग एका क्रिकेट चाहत्याने मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर या व्हिडीओला प्रचंड हिट्स मिळाल्या आहेत.

सेंच्युरिअन मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात हिंदुस्थानी संघ प्रथम फलंदाजीकरता उतरला. महेंद्रसिंग धोनी आणि मनीष पांडे यांनी चांगली फटकेबाजी केली. विशेष म्हणजे धोनीचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. मात्र असे असताना शेवटच्या षटकात धोनीने मनीष पांडेला जोरात आवाज दिला आणि दम भरला.

ओए!

वहां क्या देख रहा है,

इधर देख ले, आवाज नहीं आएगी,

इशारा देखना।

धोनीची ही वाक्यं स्टंपमधील मायक्रोफोनमध्ये कॅच झाली आणि सर्वांना टीव्हीवरून ऐकायला मिळाली. सगळ्यांना वाटलं पांडेचं लक्षं कुठे होतं?

खरं तर मनीष पांडेचं लक्षं तेव्हा स्कोअर बोर्डकडे होतं. त्यामुळे धोनी वैतागला. शेवटच्या षटकात जेवढ्या जास्त धावा काढता येतील तेवढ्या काढायच्या असतात आणि पहिली फलंदाजी असल्याने या षटकात स्कोअर बोर्डवर ध्यान देण्यापेक्षा अधिकाधिक धावांचं लक्ष्य कसं गाठता येईल हे ठरवायचं असतं. त्यामुळे धोनी वैतागला असावा आणि त्याने पांडेला दम भरला.

पाहा व्हिडीओ: