मुळा धरणावरील पाईपलाईन खचल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी । राहुरी

संपूर्ण नगर जिल्ह्याला वरदाण अशी मुळा धरणाची ओळख आहे. मात्र राहुरी तालुका शहराला पाणीपुरवठा करणारी मुळा धरणावरील पाईपलाईन खचल्याने खळबळ उडाली आहे. धरण क्षेत्रात वाळू उपसा करण्यासाठी येणाऱ्या जड वाहनांमुळे पाईपलाईन खचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राहुरी शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी १३ किलोमीटरची पाईपलाईन ४० साडेसार दशकांपूर्वी टाकण्यात आली. मात्र मंगळवारी मुळा धरणाच्या गेटखाली असलेल्या शंकराच्या मंदिराजवळ पाईपलाईन खचल्याचे उघड झाले. त्यामुळे नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला चांगलीच धावपळ करावी लागली. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.