मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, मुलायमास्त्राने महाआघाडीची बोलती बंद

82

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक नेते मुलायम सिंह यादव यांनी संसदेत मोठे वक्तव्य केले आहे. मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना मुलायम सिंह यादव यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. तसेच 2014 मध्ये जेवढे खासदार निवडून आले तेवढेच आताही यावेत असेही ते म्हणाले. मुलायम सिंह यादव यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत विरोधक आणि महाआघाडीतील नेत्यांची गोची झाल्याचे दिसून आले.

मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, हीच माझी इच्छा; शॉटगन पुन्हा धडाडली
राहुल यांची गळाभेट आणि ‘आँखो की गुस्ताखिया’वर मोदींचा निशाणा
कुठेही ‘चौकीदार’ बोला, समोरून ‘चौर है’ आवाज येईल; राहुल गांधींचा मोदींना टोला

मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी सर्व खासदारांनी लोकसभेत भाषण दिले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक नेते मुलायम सिंह यादव यांनी आपल्या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदींचे त्यांच्या कार्यकाळासाठी अभिनंदन केले व नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. तसेच आम्ही (विरोधक) सध्या संख्येने कमी असून आताही महाआघाडीचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने मोदींच्या चेहऱ्यावर हास्यतरंग उमटले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केला. परंतु महाआघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्याचा मात्र पार रंग उडाला.

लोकसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचा अवधि बाकी आहे. सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेशमधून जास्तीत जास्त खासदार निवडून आणावे लागणार आहेत. अशाच सपा आणि बसपामध्ये आघाडी झाल्याने भाजपसमोरील आव्हानं वाढली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनेही जोर लावला असून नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर ‘मिशन यूपी’ची कमान सोपवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या