चाकरमान्यांसाठी खूशखबर कोकण मार्गावर 52 उन्हाळी स्पेशल ट्रेन

सामना प्रतिनिधी। मुंबई

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीत कोकणात मुंबई ते करमाळी-सावंतवाडीदरम्यान 52 उन्हाळी स्पेशल गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांचे आरक्षण 16 मार्चपासून सुरू होणार आहे. ह्या सर्व विशेष गाडय़ांचे सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित डब्यांच्या रूपात चालविले जाणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी साप्ताहिक (8 फेऱया )
ट्रेन क्र.01051 – ही स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 17 मे ते 7 जूनदरम्यान दर शुक्रवारी रा. 8.45 वाजता सुटणार आहे.
ट्रेन क्र.01052 – ही गाडी करमाळी येथून 19 मे ते 9 जूनदरम्यान दर रविवारी दु. 12.50 वाजता सुटणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक (8 फेऱया)
ट्रेन क्र. 01015 – ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19 मे ते 9 जूनदरम्यान दर रविवारी मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल.
ट्रेन क्र. 01016 – ही विशेष गाडी करमाळीहून 18 मे ते 8 जूनदरम्यान दर शनिवारी दु. 12.50 वाजता सुटेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी साप्ताहिक (18 फेऱया)
ट्रेन क्र. 01045 – ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12 एप्रिल ते 7 जूनदरम्यान दर शुक्रवारी रा. 1.10 वाजता सुटणार आहे.
ट्रेन क्र. 01046 – ही गाडी करमाळी येथून 18 मे ते 8 जूनदरम्यान दर शुक्रवारी दु. 12.50 वाजता सुटणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड साप्ताहिक (18 फेऱया)
ट्रेन क्र. 01037 – विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून 8 एप्रिल ते 3 जूनदरम्यान दर सोमवारी रा.01.10 वाजता सुटेल.
ट्रेन क्र. 01038 – ही विशेष गाडी सावंतवाडी येथून 8 मे ते 6 जूनदरम्यान दर सोमवारी दु.2.10 वाजता सुटून दुसऱया दिवशी रा. 12.20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.