अभिनेता अक्षय कुमारने घेतली पंतप्रधान मोदींची मुलाखत

2

सामना प्रतिनिधी। मुंबई

मी आजवर जे केले नाही, असे काही करणार आहे, असे सांगून अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी सगळ्यांची उत्कंठा वाढवली होती. अखेर अक्षयने त्याचे रहस्य मंगळवारी उघड केले आहे. अक्षयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा टीझरदेखील शेअर केला आहे.

देशात निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वच जण निवडणुका आणि राजकारणावर चर्चा करीत आहेत. मी मात्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतली आहे. अशी मुलाखत घ्यायला मिळाली त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतोय असे अक्षयने पोस्टमध्ये म्हटले आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता ही संपूर्ण मुलाखत ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेवर पाहायला मिळेल, असेही अक्षय पुढे म्हणाला.