विधानसभेतही उत्तर-पूर्व मुंबईचा गड महायुतीच राखणार

173

सामना ऑनलाईन । मुंबई

मोठा जनसंपर्क, विकासकामे, स्थानिक पातळीवरील कामांमुळे मतदारांची साथ

उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघात माजी खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केल्यानंतर येथे कोण उमेदवार द्यायचा हा यक्षप्रश्न महायुतीसमोर होता. या मतदारसंघासाठी स्थानिक लोकांमध्ये मोठा जनसंपर्क असलेला उमेदवार हवा होता. प्रवीण छेडा यांचेही नाव चर्चेत होते, परंतु महापालिकेत मोठे काम आणि मतदारसंघात स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या भाजपाचे महापालिकेतील गटनेते आणि नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेमुळे मराठी मते महायुतीच्या पारडय़ात पडली तर कोटक यांचा गुजराती मतदारांशी असलेल्या संपर्काचा फायदा झाला. याशिवाय शिवसेना आमदारांची विकासकामे आणि लोकल प्रवाशांसाठी केलेले काम यामुळे उत्तर-पूर्व मुंबईचा गड राखणे महायुतीला सोपे गेले.

मराठी मतदार महायुतीच्याच बाजूने
भांडुप, विक्रोळी पार्कसाइट आणि कांजुरमार्ग येथे शिवसेनेचे प्राबल्य आहे. या ठिकाणी मराठी मतदारांची संख्या प्रचंड आहे. विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत, भांडुपचे आमदार अशोक पाटील यांनी केलेल्या विकासकामांमुळे येथील मतदार साहजिकच महायुतीच्या बाजूनेच उभा राहिला.

विधानसभेच्या पाचही जागा अनुकूल
संजय दिना पाटील यांचा भांडुप येथील मराठी मतदारांमध्ये चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्यांना भांडुपमध्ये 60 हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले, परंतु विक्रोळी पार्कसाइट, कांजुरमार्ग येथील मराठी मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. गुजराती मते महायुतीलाच मिळाली. मानखुर्द आणि शिवाजीनगरमध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांचे प्राबल्य आहे. तरीही येथील मराठी मतदारांनी महायुतीलाच मतदान केले. त्यामुळे सहा महिन्यांनी होणाऱया विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी येथील पाचही जागा अनुकूल ठरणार आहेत.kotak-f

आपली प्रतिक्रिया द्या