‘पानीपत’ मध्ये हा अभिनेता झळकणार

सामना ऑनलाईन। मुंबई

चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळे चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण ही चर्चा त्याच्या कुठल्या आक्रस्ताळेपणाची किंवा अफेअरची नसून त्याच्या येऊ घातलेल्या एका ऐतिहासिक चित्रपटाची आहे. पानीपत असे या चित्रपटाचे नाव आहे. अर्जुन त्यात पेशवा सदाशिव राव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे. आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन असून 23 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होत आहे.

.
.

गोवारीकर यांच्या खारमधील ऑफिसबाहेर नुकताच अर्जुन दिसला. पण नेहमी हटके लूकमध्ये वावरणारा अर्जुन यावेळी मात्र आपला लूक लपवत होता. यावेळी त्याने डोकं आणि चेहरा काळ्या मास्कने झाकला होता. त्याच्या त्या हालचालींवरून तो नक्कीच त्याचा नवा लूक इतक्यात दाखवण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट झाले. अर्जुनने सदाशिव राव पेशव्यांची भूमिका उभी करण्यासाठी बरीच तयारी केली आहे. त्यासाठी त्याने विग न वापरता खरचं टक्कल केलं असून त्याला प्रिय असलेली दाढी मिशीही काढून टाकली आहे. सध्या प्रॉस्थॅटीक मेकअपने हवा तो लूक मिळवणे शक्य आहे. पण गोवारीकर परफेक्शनिस्ट असल्याने त्यांनी अर्जुनला टक्कल करण्याबरोबरच दाढी मिशीही काढावी लागेल असे सांगितले होते. अर्जुननेही यास लगेच होकार दिला. नितिन देसाई यांच्या एनडी स्टुडीओत 23 नोव्हेंबरपासून या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होत आहे. या चित्रपटात अर्जुनबरोबर कृती सेननही दिसणार असून ती यात सदाशिव राव यांच्या पत्नीची भूमिका करणार आहे.

अर्जुनबरोबरच या चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर, मोहनीश बहल हे देखील मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. चित्रपटात त्यांनी शुजाद उद्दोला आणि नाना साहेब यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

.