स्वामी समर्थला जेतेपद, मुंबई शहर कबड्डी निवड चाचणी कबड्डी

1

सामान प्रतिनिधी । मुंबई

स्वामी समर्थ संघाने मुंबई जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील किशोरी गटात शानदार कामगिरी करीत जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. स्वामी समर्थने अजिंक्यपदाच्या लढतीत शिवशक्तीला 46-27 असे नमवत झळाळता करंडक पटकावला.

मध्यांतराला 28-09 अशी आघाडी घेणाऱ्या स्वामी समर्थने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय मिळवला. ऋतू परब, मानसी पवार, वैशाली चव्हाण, साक्षी जंगम, वैदेही सातर्डेकर, स्वामी समर्थकडून तर प्राची भादवणकर, मानसी पाटील शिवशक्तीकडून छान खेळल्या.