100 गुन्हे दाखल असलेल्या वॉन्टेड आरोपीला 15 वर्षांनी अटक


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला तब्बल 15 वर्षांपासून फरार असलेल्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. संतोष नायर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जवळपास 100 गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी संतोष नायरला पुण्यातून अटक केली आहे.

संतोष नायर आणि त्याच्या टोळीने 2004 साली दहिसर येथे एका हिऱ्याच्या कंपनीत दरोडा टाकून लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. यावेळी पोलिसांनी संतोषच्या 4 साथीदारांना अटक केली होती, मात्र संतोषने पोबारा केला होता. मुंबईतून पळून गेल्यावर संतोष नायर आधी केरळ, लोणावळा आणि पुण्यात स्थायिक झाला होता. पुण्यात मजुरीच काम करून भाड्याच्या घरात राहत होता. 15 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संतोषला अखेर पुण्यातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल, 4 जिवंत काडतूसे आणि एक चॉपर जप्त करण्यात आला आहे.