तुम्हांला ऑफिसमध्ये झोप येते का ?

393

सामना ऑनलाईन। मुंबई

रोजच्या धकाधकीच्या रुटीनमध्ये अनेकवेळा आपल्याला स्वत;कडे बघायला वेळच मिळत नाही. कामाचे टेन्शन, घरचे टेन्शन यात रात्री धड झोपही लागत नाही. मग दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ही अपूर्ण झोप डोळे बंद करायला लावते. या अपूर्ण झोपेमुळे अनेक मानसिक व शारिरीक व्याधीही होऊ शकतात. यात प्रामुख्याने बीपी, डायबीटीज, स्मृतीभ्रंश यांचा समावेश आहे. एवढेच नाही कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. हे जर टाळायचे असेल तर काय करायचे. ते जाणून घ्या.

रात्री जेवणाआधी किंवा नंतर 35 मिनिटे चालावे. जेणे करून जेवण पचते.

जीने चढावेत उतरावेत. शरीराची हालचाल करावी.

sleepy-2

ऑफिसमध्ये झोप येत असल्यास मोकळ्या रस्त्यावर फेरफटका मारावा.

एखाद वेळी चहा किंवा कॉफी घ्यावी

coffee

.बॉडी स्ट्रेचिंग करावी.

भरपूर पाणी प्यावे. यामुळे स्मरणशक्ती वाढेल.

जमल्यास च्युईंगम खावे

 

आपली प्रतिक्रिया द्या