ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही!

160

सामना प्रतिनिधी। मुंबई

विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी ‘एनडीए’च्याच बाजूने कलचाचणीचा कौल दिल्यामुळे विरोधी पक्षांनी अक्षरशः रान उठवले आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते किंवा त्याच्याशी छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र ईव्हीएम मशीन हॅक होऊच शकत नाही असा दावा एका निवडणूक निर्णय अधिकाऱयाने केला आहे. आयआयटीचे पदवीधर आणि आयएएस अधिकारी भावेश मिश्रा यांनी ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. मिश्रा यांनी तेलंगणा येथे भद्रचलम मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले आहे.

ईव्हीएम मशीनशी छेडछाड करून अधिकचे मतदान करता येऊ शकत नाही. नेमके किती मतदान झाले याचा आकडा राजकीय पक्षांना दिला जातो. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीचा वेगळा आकडा आला तर अधिकचे मतदान झाले होते की नाही हे स्पष्ट होते.

मतदान झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारीच मतदानाची वेळ संपल्यासाठीचे बटण दाबू शकतो. त्यावर निवडणूक अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींची सही असते. त्यामुळे हे सील तोडून इतर कुणालाही हे बटण दाबताच येत नाही.

ईव्हीएम मशीनमध्ये मतदान संपल्याची वेळही नोंद होते. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱयाकडे त्यासाठी एक डायरीही दिली जाते. जर कुणी अधिकचे मतदान करण्याचा प्रयत्न केलाच तर मतदान संपल्याची वेळ आणि प्रत्यक्षात अधिकचे मतदान केल्याची वेळ जुळत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या