दक्षिण मुंबईचा विचार करताय, पण देशाच्या सुरक्षेचे काय!

5

सामना प्रतिनिधी। मुंबई

दक्षिण मुंबईच्या विकासाचा विचार करून तुम्ही काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला. पण देशाची सुरक्षा, सशस्त्र बलांचे अधिकार याबाबतचे काँग्रेसचे चुकीचे धोरण आणि राफेल सौद्याबाबतचे बेताल आरोप याबाबत तुमचे मत काय आहे याचा उलगडा करावा, असे साकडे घालणारे खुले पत्र गोव्याचे उद्योजक आणि विश्व हिंदू परिषदेचे विश्व विभाग कार्याध्यक्ष अशोक चौगुले यांनी उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांना पाठवले आहे.

काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा देणारे रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि कोटक उद्योग समूहाचे प्रमुख उदय कोटक यांचा व्हिडीओ काँग्रेस आपल्या प्रचारात वापरत आहे. मिलिंद देवरा हे भले दक्षिण मुंबईसाठी सक्षम उमेदवार असतील, पण त्यांच्या पक्षाची अनेक धोरणे देशाची सुरक्षा, सशस्त्र बलांचे योग्य अधिकार आणि आर्थिक विकासाला मारक ठरणारी आहेत, असे चौगुले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.