मुंबई-गोवा महामार्गावर टँकरला अपघात; वाहतूक विस्कळीत

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ टँकर उलटल्याने ठप्प झालेली वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली आहे. तब्बल ३ तासानंतर ही वाहतूक सुरू झाली आहे. पूर्णपणे वाहतूक सुरू झालेली नसून एका बाजूने गाड्या सोडण्यात येत आहेत. सकाळी खेडजवळ अॅसिडचा टँकर उलटला होता. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारी म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला हटवण्याय यश आलं आहे. मात्र महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे.

ळालेली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी असंख्य पर्यटक आपल्या कुटुंबीयांसह ‘पिकनिक’चे मस्त प्लॅनिंग केले खरे… पण टॅफिक जॅमने त्याचे पार बारा वाजवले आहेत. गोव्याला जाण्यासाठी जे व्हाया रोड गेले त्यांची अर्धी सुट्टी प्रवासातच जाण्याची चिन्ह आहे.