वृक्ष प्राधिकरणातील तज्ञांबाबत भूमिका स्पष्ट करा! हायकोर्टाचे पालिकेला आदेश

9

सामना प्रतिनिधी। मुंबई

वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांची संख्या तुलनेने कमी असल्यास वृक्षछाटणी करताना त्यांच्या मतांना तेवढेच महत्त्व असेल का किंवा एखाद्या मुद्दय़ावरून नगरसेवक आणि तज्ञ यांच्यात मतभेद निर्माण झाल्यास काय करायचे याबाबत भूमिका स्पष्ट करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पालिका प्रशासनाला दिले. दरम्यान वृक्ष प्राधिकरण समितीवरील स्थगिती हटविण्यास खंडपीठाने पुन्हा एकदा नकार देत सुनावणी 3 जूनपर्यंत तहकूब केली.

वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांचा अभाव असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने याची दखल घेऊन 24 ऑक्टोबर 2018 रोजी त्यावर स्थगिती घातली व जोपर्यंत वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ञांची नियुक्ती करणार नाही तोपर्यंत वृक्षतोडीबाबत पालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावेत असे आदेश दिले. परंतु पावसाळा जवळ येत असून त्यापूर्वी धोकादायक झाडे तोडणे गरजेचे असल्याने वृक्ष प्राधिकरणावरील स्थगिती उठविण्यात यावी अशी मागणी पालिकेने हायकोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या