राज्यातील बैलगाडा शर्यती रखडल्या

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रपतींनी मंजुरी दिली तरी महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन उच्च न्यायालयाच्या मनाईमुळे रखडले आहे. महाराष्ट्राने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र स्पर्धेदरम्यान प्राण्यांना इजा होऊ नये यासाठी राज्य सरकारने अद्याप नियम केलेले नाही. जोपर्यंत हे नियम न्यायालयाला सादर केले जात नाही तोपर्यंत राज्यातील बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाला परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली आहे. बैलगाडा शर्यतीबाबत २ आठवड्यात आपले म्हणणे मांडा असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.