मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून कोर्टाने सरकारला झापले

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसानंतर मुंबई-गोवा महामार्गाची अशरक्ष: चाळण झाली आहे. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने गणेशभक्त गावाकडे निघतात. कोंड्ये गावाकडे निघालेल्या दोन कुटुंबावर मंगळवारी काळाने घाला घातला होता.

दहिसरच्या गणेश भक्तांवर कोकणात काळाचा घाला

रस्त्याची वाईट अवस्था आणि या महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे मुंबई उच्च न्यायालय आज जबरदस्त संतापले होते. न्यायालयाने सरकारची आज जाम तासली. किती वर्ष तुम्ही या महामार्गावरचे खड्डे भरताय? जर खोटं बोलत राहिलात तर खड्डे पाण्यासाठी कोर्ट कमिश्नर नेमावा लागेल अशा शब्दात न्यायालयाने दम दिला. राज्य सरकारने या महामार्गावरचे सगळे खड्डे बुजवल्याचा न्यायालयात दावा केला होता.