आणखी एक अभिनेता घटस्फोटाच्या मार्गावर, बायकोने घर सोडल्याची चर्चा

21

सामना ऑनलाईन। मुंबई

गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडमध्ये घटस्फोटाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. अरबाज-मलाईका, अर्जुन रामपाल-मेहेर, हृतिक रोशन- सुझान खान यांच्यानंतर आता बॉलीवूडपासून दूर असेलला अभिनेता इमरान खान व त्याची पत्नी अवंतिका विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त काही इंग्रजी वृतपत्रांनी दिल्या आहेत. दोघांमधील वाद टोकाला गेल्याने अवंतिकाने इमरानचे घर सोडले असून ती मुलीला घेऊन माहेरी निघून गेल्याची चर्चा आहे.

इमरान आणि अवंतिका यांच्या लग्नाला आठ वर्ष झाले असून त्यांना एक मुलगीही आहे. आठ वर्षापूर्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले इमरान आणि अवंतिकाचे प्रेम सर्वश्रूत होते. त्यांना लव्ह बर्डस म्हणूनही बोलले जात होते. पण आता मात्र चित्र बदलले असून त्यांच्यात अनेक विषयांवरून वाद सुरू झाले आहेत. त्यातच 2015 नंतर इमरानला एकही चित्रपट न मिळाल्याने तोही वैतागला आहे. त्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा देखील त्यांच्यातील वादाच्या अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वाचा मुद्दा असल्याची चर्चा आहे.

रोज रोजच्या या वादाला कंटाळून अवंतिकाने इमरानचे पाली हिल येथील घर सोडले असून ती माहेरी निघून गेली आहे. दरम्यान, या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी दोघांची कुटुंबे प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या