इंडिगो एअरलाइनचा प्रवास फक्त 999 रुपयांत

41

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

इंडिगो एअरलाइनने 11 जूनपासून सलग चार दिवस आपल्या तिकिटांमध्ये मोठी कपात केली असून घरेलू प्रवासासाठी प्रवाशांना केवळ 999 रुपये द्यावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी फक्त 3,499 रुपये मोजावे लागतील.

इंडिगोच्या समर सेलमुळे सर्वसामान्यांचे विमानातून फिरण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. इंडिगोने उन्हाळी सेल सुरू केला असला तरी या चार दिवसांत कोणतीही तिकिटे काढता येतील असा समज करून घेऊ नका. या सेलमधून काढलेल्या तिकिटांद्वारे 26 जून ते 28 सप्टेंबर या कालावधीतच विमान प्रवास करता येणार आहे. गुरुग्राम एअरलाइन कंपनी या ऑफरमध्ये किमान 10 लाख सीटसाठी तिकिटांची विक्री करणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सच्या वापरावर विशेष सूट देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या