देशात मुंबई सर्वात इनोव्हेटिव्ह, जगातील कल्पक शहरांच्या यादीत स्थान


सामना ऑनलाईन । लंडन

काही तरी वेगळे आणि हटके करण्याच्या शर्यतीत मुंबई देशात अव्वल ठरली आहे. जुन्या इमारतींचे जतन, नव्या इमारतींची रचना, सांस्कृतिक उत्सव, कला, संगीत, भाषा आणि इंटरनेट, मोबाईलचा वापर, शिक्षण या क्षेत्रात मुंबईने कल्पकता दाखवत वेगळा ठसा उमटवला आहे. ‘2 थिंक नाऊ’ने केलेल्या सर्व्हेक्षणात इनोव्हेटिव्ह अर्थात जगातील कल्पक शहरांच्या यादीत पहिल्या 100 शहरांमध्ये आपली मुंबई विराजमान झाली असून  92 वे स्थान पटकावले आहे.

जपानमधील टोकियो शहर इनोव्हेटिव्ह शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. रोबोटिक्स आणि थ्रीडी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल टोकियोने हे स्थान पटकावले आहे. टोकियोने यंदा लंडन शहराला मागे टाकले असून या यादीत टॉप 10 मध्ये अमेरिकेतील चार शहर आहेत. हिंदुस्थानीतल कोणतेही शहर या यादीत पहिल्या 50 मध्ये नाही. पण मुंबईनंतर बेंगलुरू 139 व्या, दिल्ली 199, चेन्नई 252 तर हैदराबाद 316 व्या स्थानावर आहे.

इनोव्हेटिव्ह शहरापैकी टॉप 10 शहरे

टोकियो, लंडन, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स, सिंगापूर, बोस्टन, टोरंटो, पॅरिस, सिडनी