मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात लेटमार्कने, मध्य रेल्वे उशिराने

1
mumbai-local

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत धावणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा एकादा उशिराने सुरू आहे. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल 15 ते 20 उशिराने धावत असल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर सकाळी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. जलद आणि धिम्या अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असलेतरी यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नेहमीच्याच झालेल्या या त्रासामुळे रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर नोकरदारवर्ग हैराण झाल्याचे दिसत आहे.