महाराष्ट्र पवन ऊर्जानिर्मितीत पिछाडीवर


सामना प्रतिनिधी। मुंबई

स्वच्छ आणि स्वस्त वीज अशी ओळख असलेल्या पवन ऊर्जानिर्मितीत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राची एकूण वीजनिर्मिती क्षमता देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असली तरी अपारंपरिक ऊर्जेचा भाग असलेल्या पवन ऊर्जानिर्मितीमध्ये मात्र तिसऱया स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर तामीळनाडू असून दुसऱया स्थानावर गुजरात आहे.

केंद्र सरकारने 2022 पर्यंत अपारंपरिक ऊर्जीनिर्मितीची क्षमता 1 लाख 75 हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार सर्वच राज्यांनी मोठय़ा प्रमाणात पवन ऊर्जा प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन दिले आहे. मात्र त्याचाच भाग असलेल्या पवन ऊर्जानिर्मितीत महाराष्ट्र तामीळनाडू आणि गुजरातच्या मागे गेला आहे. महाराष्ट्राची एकूण वीजनिर्मिती क्षमता देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे 43 हजार 779 मेगावॅट एवढी आहे. त्याखालोखाल तामीळनाडूची 30 हजार 447 मेगावॅट आहे. पवन ऊर्जानिर्मितीकडे महाराष्ट्राने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. एकूण वीजनिर्मितीमध्ये दुसऱया स्थानावर असलेल्या तामीळनाडूने आपली पवन ऊर्जानिर्मिती क्षमता 8 हजार 631 मेगावॅटपर्यंत वाढवली आहे, तर गुजरातची पवन ऊर्जानिर्मिती क्षमता 6 हजार 44 मेगावॅट आहे. तर महाराष्ट्रात केवळ 4 हजार 789 मेगावॅट पवन ऊर्जानिर्मिती करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकमध्ये साडेचार हजार मेगावॅट एवढी पवन ऊर्जानिर्मिती होत असल्याचे केंद्रीय वीज प्रधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

प्रदूषण वाढणार

महाराष्ट्राची एकूण वीजनिर्मिती क्षमता सर्वाधिक असून मागणीही इतर राज्यांच्या तुलनेत जास्त म्हणजे 24 हजार मेगावॅटच्या घरात आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जानिर्मिती कमी होत असल्याने विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशावर चालणारे औष्णिक वीज प्रकल्प मोठय़ा प्रमाणात चालवावे लागत असल्यामुळे प्रदूषणात वाढ होणार आहे. हे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठीच अपारंपरिक वीजनिर्मितीला चालना दिली जात आहे.

जूनमध्ये लाँच होणार देशातील पहिली इंटरनेटवर धावणारी कार

ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) द्वारे निर्मित आणि आयस्मार्ट नेक्स्ट जेन तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘एमजीहेक्टर’ ही देशातील पहिली इंटरनेट कार हिंदुस्थानात जून महिन्यात लाँच होणार आहे. या इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्टये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी उलगडून दाखवली. ही कार फाईव्ह जी ने कनेक्ट असणार असून या कारची बरीचसी कामे व्हाईस कमांडच्या साथीने पार होणार आहेत. तसेच वेळोवेळी होणारे सॉफ्टवेअरच्या अपडेटसाठी देखील वारंवार कंपनीत जाण्याची गरज भासणार नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.