मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱयांचे आंदोलन

1

सामना प्रतिनिधी। मुंबई

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (मुनोवा) तर्फे 24 एप्रिलपासून आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यापीठातील कर्मचारी वर्ग काळय़ा फिती बांधून काम करणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत मनोवाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्मचाऱयांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कुलसचिव व वित्त लेखा अधिकारी रजेवर गेल्यास त्यांचा कार्यभार विद्यापीठातील पात्र व ज्येष्ठ उपकुलसचिवांना द्यावा, असा शासन निर्णय असतानादेखील वेळोवेळी पात्र व्यक्तीला डावलले जात असल्याचा आरोप मुनोवाने केला आहे. या विरोधात मुनोवाच्या वतीने 24 एप्रिलपासून आंदोलन करण्यात येणार असून आंदोलन काळात कर्मचारी काळय़ा फिती बांधून काम करणार असल्याचे मुनोवाचे अध्यक्ष दीपक वसावे, उपाध्यक्ष कृष्णा पराड, सचिव विनोद मळाळे यांनी स्पष्ट केले.