पुन्हा येतोय मराठी ‘बिग बॉस’

10

सामना प्रतिनिधी। मुंबई

मराठी टेलिव्हिजनवरचा लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस’ मराठी पुन्हा एकदा 26 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱया सीजनमध्ये 15 सेलिब्रेटी 100 दिवस एकत्र राहणार असून त्यांच्यावर 75 कॅमेऱयांचा वॉच असणार आहे.

यंदा लोणावळ्याऐवजी गोरेगावच्या फिल्मसिटीत 14 हजार चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये सेट तयार केला आहे. या घराला आलीशान मराठमोळ्या वाडय़ाचे स्वरूप देण्यात आले आहे, ज्याच्या मध्यभागी मोठे अंगण आणि मोठे ऍक्टिव्हिटी क्षेत्र असणार आहे. याव्यतिरिक्त एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. सध्या टीव्हीवर झळकणाऱया बिग बॉसच्या प्रोमोवरून यंदा घरात कोणते सदस्य असणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 26 मे रोजी सायंकाळी 7 वाजता होणाऱया दिमाखदार सोहळ्यात या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे.

मागच्या पर्वापेक्षा यंदाचे पर्व अधिक रंजक व्हावे यासाठी आम्ही कार्यक्रमात काही बदल केले आहेत. अधिक कठोर नियम आणि आव्हानात्मक टास्क यंदा पाहायला मिळतील. असे वायकॉम 18 चे व्यवसायप्रमुख,निखिल साने यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या