‘पीएम नरेंद्र मोदी’ 12 एप्रिल रोजी झळकणार

सामना प्रतिनिधी। मुंबई

एकूण सात टप्प्यांत होणाऱया लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी पार पडल्यानंतर दुसऱयाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.

‘मेरी कॉम’ या चित्रपटामुळे गाजलेले ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या मोदी यांच्यावरील चित्रपटात अभिनेते विवेक ओबेरॉय हे मोदींच्या भूमिकेत झळकले आहेत. तर पंतप्रधानांच्या माता हिराबेन यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री जरीना वहाब यांनी केली आहे. तर बोमन इराणी हे रतन टाटा यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.