परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणारी टोळी गजाआड

1
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो
 सामना ऑनलाईन । मुंबई

परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील चार जणांपैकी एक जण मुंबईचा असून तीन जण बंगळुरुतील आहेत. अजय गुप्ता, सेड्रीक रॉबर्ट, विग्नेश सी आणि स्नेहा पंचरीया अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, राजस्थान आणि कर्नाटकासह इतर राज्यातील अनेक उमेदवारांना गंडा घालल्याचे उघड झाले आहे.

नोकरी देण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या ही टोळी गेल्या वर्षभारापासून कार्यरत असून त्यांनी देशभरातील शेकडो लोकांना फसवलं आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गलेलठ्ठ पगाराचे आमिष दाखवून परदेशात नोकरीची ऑफर देत होते. एकदा सावज हाती लागला की त्याच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून ही टोळी पैसे उकळायची. संशय येण्याच्या अगोदर पैसे घेऊन गायब व्हायचे. या टोळीने देशभरात अनेकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. मुंबई पोलिसांकडे देखील अशाच प्रकारची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आल्यावर या टोळीने देशभरातील अनेकांना नोकरी देण्याच्या नावाने फसवणूक केल्याचे समोर आले.

अजय गुप्ता हा टोळीचा म्होरक्या असून तो आधी कॅनडाला कॉल सेंटरमध्ये काम करत होता आणि तिथेच त्याला या जॉब रॅकेटची कल्पना सूचली. त्यानंतर त्याने सेड्रीक रॉबर्ट, विग्नेश सी आणि स्नेहा पंचरीया यांच्या मदतीने ‘इंटरनॅशनल जॉब अँड फ्री रिक्रुटमेंट’ नावाने फेसबुक तयार करून तसेच व्हॉट्सअॅपवरून अनेकांनी फसवणूक केली. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना बबंगुरुमधून बेड्या ठोकल्या आहेत.