शाहरूखच्या लेट नाईट बर्थडे पार्टीत पोचले पोलीस

66

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता शाहरुख खानने 2 नोव्हेंबर रोजी वयाची 53 वर्षे पूर्ण केली. वाढदिवशी त्याने झिरो या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केल्यानंतर शाहरुखने जवळच्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली. वांद्रा येथील ज्या रेस्टॉरंटमध्ये त्याने पार्टी ठेवली होती, तिथल्या ठणाणा वाजणाऱ्या म्युझिकमुळे पोलिसांना तिथे पोचावे लागले. त्यांनी रेस्तराँच्या मालकाला सांगून म्युझिक बंद करायला लावले. शहरातील रेस्तराँ मध्यरात्री 1 वाजल्यानंतर सुरू राहू शकत नाहीत, मात्र तरीही पार्टीही सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी रेस्तराँच्या मालकाला सांगून म्युझिक बंद केले. म्युझिक बंद होताच शाहरुखची पार्टी संपली आणि काही मिनिटांतच तो रेस्तराँमधून मित्रांसोबत बाहेर पडला.

आपली प्रतिक्रिया द्या