मुंबई पोलिसांकडून पाच हजार कोटींचा ड्रग्ज स्वाहा

मुंबई पोलिसांनी ड्रग्ज विरोधात धडक कारवाई सुरू ठेवली असून गेल्या तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल चार हजार किलो वजनाचे व पाच हजार कोटी किमतीच्या ड्रग्जची विल्हेवाट लावली आहे. तर 17 तारखेला 437 किलो वजनाचा व नऊ कोटी किमतीचा ड्रग्ज भट्टीत स्वाहा केला आहे.

मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांत ड्रग्जविरोधात धडक कारवाया केल्या आहेत. विविध ठिकाणी छापेमारी करून हजारो कोटींचा ड्रग्जसाठा हस्तगत केला. तो ड्रग्जसाठा अखेर नवी मुंबईतील भट्टीत जाळून टाकला.

एटीएसकडून 64 कोटी 36 लाखांच्या ड्रग्जची विल्हेवाट

महाराष्ट्र दहशतवादविरोधी कक्षाकडून चार गुह्यांत 161 किलोंचा ड्रग्ज हस्तगत करण्यात आला होता. जवळपास 64 कोटी 36 लाख किमतीच्या या ड्रग्ज साठय़ाची एटीएसकडून विल्हेवाट लावण्यात आली.